गाव सुटना Gaav Sutana Song Lyrics | Ganesh Atmaram Shinde | Boyz 4
Presenting Superhit Marathi Songs "Gaav Sutana Song" Beautifully Sung by Padmanabh Gaikwad .Lyrics penned by Ganesh Atmaram Shinde.
Gaav Sutana Song lyrics |
Song : Gaav Sutana
Lyrics : Ganesh Atmaram Shinde
Singer : Padmanabh Gaikwad
Composed by : Avadhoot Gupte
Movie : Boyz4
Gaav Sutana Song lyrics
Lyrics :
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना
बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंग
जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग
जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी..
पदव्यांच्या ढिगार्यात पाटी राहिली कोरी
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी
म्हातारीच्या डोईवरला पदर हटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती
ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती
सर्जा राजाची जोडी माग हटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी
प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी
दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदी चाखु पुरण पोळी
चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना....
- Share