वाट दिसू दे Vaat Disu De Lyrics | Ajay Gogavle | Marathi Lyrics
Presenting Superhit Marathi Songs "Vaat Disu De" Beautifully Sung by Ajay Gogavle & Yogita Godbole.Lyrics penned by Rooh.
Movie: Jaundya na Balasaheb (2016) |
Song : Vaat Disu De
Lyrics : Rooh
Singer : Ajay Gogavale & Yogita Godbole
Movie : Jaundya na Balasaheb
वाट दिसू दे Vaat Disu De Lyrics In Marathi | Ajay Gogavle | Marathi Lyrics
Lyrics :
वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे
संग सोबतीची साथ
मग दिवाभीत रात
आज पहाटंच्या पावलाला
श्वास फुटू दे
हिरव्या दाण्याचं दान दिलं त्यानं
वसाडाचं रान झालं जी...
आरं मातीच्या पोटात आस्मानच बळ
माऊलीची लाज राख जी...
या मिणमिणत्या दिव्याला तू साकडं घाल
या तळमळत्या जीवाला दे जाणीव खोल
दहे धगधगत्या इखाऱ्याला मायेची ओल
या रखरखत्या भुईला दे घामाचं मोल
केली निंदनी पेरनी
उधळून जिंदगानी
कुणब्याचं सारं रान
आबादान हसू दे
भल्याची पुण्याई उभी तुझ्या मागं
जरा निगुतीनं वाग जी...
आरं ढळून इमान लागू नये डाग
दिल्या सबुदाला जाग जी...
या सळसळत्या वादळाला आलं उधाण
या लखलखत्या आभाळाचं चांदणं न्यारं
या रगरगत्या उन्हानं चेतवलं भान
दे कोसळत्या पावसाची अनादि तान
मन शुद्ध निर्मळ सत्वाचा परिमळ
या अरुपाचं रूप आरशात दिसू दे
वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे
- Share
MORE SONGS ➤
वाट दिसू दे Vaat Disu De Video Song | Ajay Gogavle | Marathi Lyrics