पाऊल थकल नाही Paul Thakla Nahi Song Lyrics | Ajay-Atul | Marathi Lyrics
Presenting the full Lyrics of Paul Thakla Nahi Song Sung by Ajay Gogavle and Lyrics Written by Ajay Gogavle.
Song : Paul Thakla Nahi
Lyrics : Ajay Gogavale
Singer : Ajay Gogavale
Music Director : Ajay-Atul
Music On : Evrest Marathi
पाऊल थकल नाही Paul Thakla Nahi Song Lyrics | Ajay-Atul | Marathi Lyrics
Lyrics:
रखरखत्या रानातून
थोडं पुढं जाऊ गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई
सुकलेल्या भाकरीला
पान्यासंग खाऊ गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई
झालो बरबाद जरी
लागला डाग तरी
कलेची आग सारं जाळुन बी जाईना
अडला घास असा
का वनवास असा
पन ह्यो ध्यास अजून बी मागं ऱ्हाईना
फिरला त्यो वासा घरं फिरलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई
काळरात आली तरी पडलं सपान रं
डोळ्यामंदी पानी तरी गळ्यामंदी गानं रं
त्येचा हात पाठीवर सोनियाची खानं रं
शरमेनं न्हाई कदी झुकली मान रं
हात पसरून गड्या सुख येत न्हाई रं
डोळझाक करुन बी दुःख जात न्हाई रं
नशीबाचं भोग कुना चुकलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या
पाऊल थकलं न्हाई