Rampaat Rap Lyrics | Rampaat | Chinar & Mahesh

Rampaat Rap Lyrics From Marathi Movie "Rampaat" Starring  Abhinay Berde & Kashmira Pardeshi Directed by Ravi Jadhav.

Rampaat Rap Lyrics | Rampaat | Chinar & Mahesh


Rap Credit:

Movie: Rampaat
Song: Rampaat Rap
Singers: Chinar & Mahesh
Rappers: A-Jeet, J-Subodh, Jazzy Nanu, Axsboy, Killer Roxx: Beatboxer
Music: Chinar & Mahesh
Lyricist: Jazzy Nanu, A-Jeet, J-Subodh, Axsboy & Ravi Jadhav
Arrangers/Programmers: Rohan Puntambekar
Mixed & Mastered: Bipin Desai at CNM Music Factory
Song Recorded at CNM Music Factory, Thane
Recording Engineer: Bipin Desai
Shehnai Performed by Omkar Dhumal


Rampaat Rap Marathi Lyricsये भावड्या ऐक ना बे
मराठी रॅप हा बे
हा घालणार राडा उडेल तुझा थरकाप ना बे
संताप हा रे,
होईल तुझाच ना रे,
जेव्हा मी देईन तुला शब्दांचा हा शॉट ना रे
किती आले,
किती गेले कोणाच्या आलो नाय हाताने
घाम सांडून,कला मांडून,
आलो स्वतःशी मी भांडून
केली मेहनत, बनलो मेहनती,
केली उन्नती, केली प्रगती,
अशी घेतली गती मनाची,
वाढवली श्रीमंती!

जगात भारी आम्ही पोरं मराठमोळी
जर का ठरवलं काही करू मुलं नादखुळी
डोक्याला शॉट नाय बाकी हे निवांत हाय
नडला जर का आम्हा तर भावा व्हणार दंगल नाय
आलो म्होरं आम्ही पोरं अंगी बळ आहे जोर
बनू थोर बोली गोड मेहनतीची त्याला जोड
स्वप्नंं केली पूर्ण काढल्यात जागून राती
आता जगणं माझं फक्त मराठीत गाजण्यासाठी

रंपाट लय रंपाट
बिंधास मराठी पोरं ही रंपाट

रंपाट लय रंपाट
घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट..

जपली मराठी संस्कृती,जोडली नाती,
माती ख्याती विसरून जाती पाती महाराष्ट्राची ही कीर्ती सांगू किती,
येईल भरती,
प्रेम करतो भाषेवर्ती जपतो माणुसकी मराठी सांगतो नवशाहीर
अभिमानाने,
ज्ञानाने लहान मोठ्या थोराने ऐक तुझ्या कानाने रंपाट या पोराने केला धुरळा,
आत शिरला,पुरून उरला मर्द गडी,
भाषेत गोडी घेतली रंपाट उडी बघ कशी भुरर

तांबडा पांढरा व्हढला हाय
रांगडा मी भिडलो हाय
घाटी मी मराठी म्हणून लेका मी तर रंपाट हाय
कालचा मी आज नाय
स्वप्नं जगतोय सत्त्यात काय
मागून बोलणारे हे आज बोलतायत
अगं आय आय…

प्रवाहाच्या विरोधात भावा पव्हलोय मी
आणली ती स्थिती आधी माझी कधी नव्हती
येऊदेत कितीपण अडचणी माझ्या म्होरं हसून मी बोलेन त्यांना काय चालतंय की

रंपाट लय रंपाट
बिंधास मराठी पोरं ही रंपाट…

रंपाट लय रंपाट
घेऊ मुठीत सारी दुनिया रंपाट…

Rampaat Rap Lyrics | Rampaat | Chinar & Mahesh Rampaat Rap Lyrics | Rampaat | Chinar & Mahesh Reviewed by Marathi Lyrics on August 22, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.